सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा उपक्रम…
कणकवली, ता.४ : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सिंधुदुर्ग जिल्हयात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने दिलेल्या वेब साईड वर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे तसेच आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्याबाबतची माहिती संबंधित व्यक्तींना सुलभ रित्या मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने कणकवली कुडाळ व मालवण तालुक्यात तीन माहिती केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
सदर परवानगीसाठी कणकवली विजय भवन कार्यालय – नितीन राऊळ मोबा. नं. ९०११३७८९००, कुडाळ शिवसेना शाखा – बाबी गुरव मोबा. नं. – ८८०६८३४५४७, मालवण शिवसेना शाखा – अनंत पाटकर मोबा. नं.- ९४०४७५०१९४ या क्रमांकावर संपर्क साधावा
यासाठी लागणारी कागदपत्रे
पोलीस अधीक्षक यांच्या नावे अर्ज, ज्या गाडीने जाणार त्या गाडीची कादगपत्रे, शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर कडून कोविड 19 या रोगाची लक्षणे नसल्याचे सर्टिफिकेट (प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ), आधार कार्ड, पासपोर्ट साईझ एक फोटो,