वैभववाडी.ता,०४: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा समाज कल्याण सभापती सौ. शारदा कांबळे यांनी आढावा घेतला. सौ. कांबळे यांनी वैभववाडी तालुक्यातील नेर्ले व भुईबावडा आरोग्य उपकेंद्राला भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या खबरदारी व कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हया बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर गावातील ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे. व त्याची तात्काळ माहिती आरोग्य प्रशासनाला कळवावी असे आवाहन सौ. शारदा कांबळे यांनी केली आहे. क्वारंटाईन करण्याबाबत कुणाचीही गय करू नये अशा सूचना शारदा कांबळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपसभापती दूर्वा खानविलकर, माजी सभापती मंगेश गुरव, सरपंच, उपसरपंच व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांची भुईबावडा व नेर्ले आरोग्य उपकेंद्राला भेट…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES