नितेश राणे; जिल्ह्यातील व्यापा-यांसोबत प्रशासनाचा खेळ सुरू असल्याचा आरोप…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात फक्त ५० टक्के पगार देण्यात आला होता.तर एप्रिल महिन्याचा पगार त्यांना अद्याप प्राप्त झाला नाही.त्यामुळे अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने आपले काम बंद केले,तर त्याला जबाबदार कोण ?, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना केला आहे.दरम्यान जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसोबत प्रशासनाचा खेळ सुरू आहे,काही तासात बदलणाऱ्या प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडत चालले आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी,प्रांत व पोलीस प्रशासनात ताळमेळ नसल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे या विषयाकडे आपण जिल्हाधिकारी म्हणून गांभीर्याने लक्ष घालावा,अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
श्री.राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे,क्वारंटाईन कक्षामध्ये लोकांची होणारी गैरसोय,त्याठिकाणची दुरावस्था,त्यांना मिळणारे जेवण,रोज टेंपरेचर चेक न करणे,अशा पद्धतीच्या चुका होत,असताना जिल्हा वासियांनी कोरोनाच्या विरुद्ध कसं लढायचं ?,असा सवाल उपस्थित केला.तसेच व्यापारी व सामान्य नागरिक यांना एक न्याय तर सत्ताधारी- लोकप्रतिनिधी व नेत्यांना वेगळा न्याय,अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे.त्यामुळे अशी चूक जर प्रशासनाकडून होत असेल तर आम्हाला सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे,असे त्यांनी म्हटले आहे.