सिंधुदुर्गनगरी.ता,०५: जिल्ह्यात एकूण ४८८ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी ३२३ व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर १६५ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण ५६६ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ५१८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ४८ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस ६७ व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी ३० रुग्ण हे विशेष कोवीड रुग्णालयात दाखल असून ३७ रुग्ण हे विशेष कोवीड आरोग्य केंद्रामध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज दिवसभरात ४५८४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक कोरोना बाधीत रुग्ण असून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत.