“त्या” युवकांची व्यथा; संंबधित प्रकरणाची चौकशी करू,जिल्हा शल्यचिकीत्सक…
सावंतवाडी,ता.०६: कोरोना पॉझीटिव्ह म्हणून आलेल्या “त्या” युवकाला स्वॅब तपासणीसाठी कॉरन्टाईन करण्यात आलेल्या अन्य सात ते आठ युवकांसोबत एकाच गाडीतून पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.हा प्रवास आमच्यासाठी जीवघेणा आहे.त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण?,असा प्रश्न त्यांनी केला आहे.याबाबतची माहीती खुद्द कॉरन्टाईन असलेला युवक हेमंत वागळे यांनी दिली.दरम्यान या प्रकरणाची प्रशासनाकडुन गंभीर दखल घेतली जाणार असून,याला जबाबदार असणार्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत,असे जिल्हा शल्यचिकीत्सक धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.
याबाबत घडलेली अधिक माहीती अशी की,वायंगणी (ता.वेगुर्ला) येथे पॉझीटिव्ह म्हणून आढळलेला युवक हा मुंबई येथे आंबा वाहतूक करण्यासाठी गेला होता.त्या ठीकाणावरुन आणल्यानंतर त्याला कॉरन्टाईन करण्यात आले होते.दरम्यान त्याच्यासह अन्य लोकांचा स्वॅब तपासण्यासाठी सर्व लोकांना घेवून जिल्हा रुग्णालयात नेले होते.त्या ठीकाणी स्वॅबचे नमुन घेतल्यानंतर त्यांना एकाच रुग्णवाहीकेतून सावंतवाडी व वेगुर्ला येथिल कॉरन्टाईन सेंटरवर सोडण्यात आले.दरम्यान काल सायंकाळी उशिरा आलेल्या तपासणी अहवालात वायंगणीचा तो युवक पॉझीटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे त्यांच्या समवेत एकाच गाडीतून प्रवास करणार्या अन्य कॉरन्टाईन युवकांच्या पायाखालची वाळू सरकली.याबाबत त्यांनी चौकशी केल्यानंतर तोच युवक पॉझीटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान याबाबतची माहीती रुग्णवाहीका चालक आणि कॉरन्टाईन असलेला युवक वागळे यांनी दिली.
ते म्हणाले,आपल्या सोबत सावंतवाडी विलगीकरण कक्षात ठेवलेले पाच जण आणि वेगुर्ल्यातील तीघे जण एकाच गाडीतून पाठविण्यात आले होते.त्यामुळे आम्हाला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे याची गंभीर दखल घेवून आरोग्य व जिल्हा प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी,आमच्या तपासण्या कराव्यात,तसेच आमचे काही बरेवाईट झाल्यास आमच्या कुंटूबाची जबाबदारी घ्यावी,तसेच हा प्रकार केवळ आरोग्य प्रशासनाच्या चुकीमुळे झाला आहे,त्यामुळे या प्रकाराला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक धनंजय चाकुरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,ही चुक १०८ रुग्णवाहीका चालक आणी संबधित आरोग्य कर्मचार्याची आहे,अशा प्रकारे कॉरन्टाईन करण्यात आलेले युवक त्यांनी एकाच गाडीतून पाठवून देणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.