जिल्हावासीयांची व्यथा; लोकप्रतिनीधी व जिल्हा प्रशासनाने पुर्नविचार करण्याची गरज…
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.०६: कोरोनाचा प्रादुर्भात राज्यात असला तरी हे लोण सिंधुदूर्ग जिल्ह्यापर्यत पोहोचले नव्हते,अशा परिस्थितीत मुंबईत आलेल्या लोकांकडुन जिल्हयात कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे जिल्हावासीयांची व्यथा म्हणजे “खाया पिया कुछ नही,और ग्लास तोडा बाराना”,अशी झाली आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करता या ठीकाणी बाहेरुन येणार्या आणि आता भविष्यात आणल्या जाणार्या जिल्हावासीयांसह चाकरमान्यांबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे,अन्यथा ग्रीन झोनकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करणारा आपला जिल्हा नेमका कोणत्या दिशेने जाईल हे मात्र प्रश्नचिन्ह आहे.
शासनाची कोणतीही योजना असो वा उपक्रम नेहमी अग्रेसर राहीलेल्या सिधुदूर्ग जिल्ह्याने कोरोनावर मात करण्यासाठी मोठया खस्ता खाल्या.पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर त्याला योग्य पध्दतीने सर्वानीच प्रतिसाद दिला.तब्बल इतके दिवस लॉकडाउनला प्रतिसाद दिला.त्यामुळे जिल्ह्यात एक ही रुग्ण मिळाला नाही,अशा परिस्थिती कणकवली भागात रेल्वेने प्रवास करणार्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यास दिसून आले.त्यानंतर कुडाळ तालुक्यातील एका युवतीला आणि आता वेंगुर्ले तालुक्यातील एका आंबा व्यावसायिकाला ही लागण झाल्याचे पुढे आले.हा सर्व प्रकार लक्षात घेता सििंधुदूर्ग जिल्ह्यातील जनतेने याकडे गार्भीयाने पाहील्यामुळे हा सर्व प्रवास सुखकर होईल.आपला जिल्हा कोरोनाबाधीत होणार नाही.याची सर्वानीच खबरदारी घेतली,मात्र बाहेरुन आलेल्या तिघा रुग्णांनी त्यात भर घातली आणि जिल्हावासीयांचे स्वप्न भंगले.अगदी तीन मे ला आपण ग्रीन झोन होवू आणि सर्व व्यापार उद्योग सुरू होतील,या आशेवर असलेल्या जिल्हावासीयांना आणखी दोन आव्हानांना आता सामोरे जावे लागणार आहे.तर त्याच्याही पलीकडे आता गोव्यासह मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना आणण्याबाबत मतमतांतरे सुरू आहे.त्यांना अशा परिस्थितीत या ठीकाणी आणल्यास नेमके काय होवू शकते,याचा विचार न केलेला बरा.
सिंधुदूर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तसेच बाहेरुन चाकरमान्यांना आणल्यास त्यांची करावी लागणारी सोय या सर्व गोष्टी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुर्नविचार करणे काळाची गरज आहे.