भास्कर परब; जिल्हा प्रशासनाने अन्य पर्याय शोधण्याची मागणी
कुडाळ.ता,०६: सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना पासून मुक्त करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्यांसह,आंबा वाहतूक बंद करणे हाच पर्याय आहे.याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी.अन्यथा भविष्यात भयान परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भिती तेर्सेबांबर्डे येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भास्कर परब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या योगदानाच्या पार्श्वभूमीवर दोन एप्रिलला आपला जिल्हा केंद्रीय स्तरावर ग्रीन झोन घोषित झाला. पण दुर्दैवाने त्याच कालावधीत आणखी एक रूग्ण पॉझिटिव्ह सापडला, आणि लगेच आपला जिल्हा ऑरेंज झोनमध्ये घोषित झाला.आणि जिल्ह्यात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली.
सतरा मे पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला.या कालावधीत सिंधूदूर्ग जिल्हा ग्रीन झोन घोषित व्हायला हवा, आणि पुढील कालावधीत या जिल्ह्यात एकही रूग्ण सापडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा निर्धार केला असतानाच आज वेंगुर्ला तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला.आणि प्रशासन खडबडून जागे झाले.
आंबा वाहतुकीसाठी ट्रकचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी, ड्रायव्हर, क्लिनर यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाय योजना केलेली नाही.त्यामुळे कोणीही उठतो आणि आंबा वाहतुकीच्या भाड्यासाठी तयार होतो. स्वताच्या जिवापेक्षा यांना भाडे महत्वाचे वाटते.कारण हेतू एकच बागायतदारांचा आंबा मार्केट मध्ये गेला पाहिजे. ट्रक मालकाला जादा दराने भाडे मिळते. दोन्हीही सुरक्षित.पण ड्रायव्हर व त्यांच्या बरोबरच्या कामगारांना काय मिळाले? तर आंबा मार्केट मध्ये पोहोचवून परत येताना कोरोना व्हायरस.त्यातलाच प्रकार आज वेंगुर्ला तालुक्यात निर्माण झाला. आणि आपला जिल्हा अडचणीत सापडला. याला जबाबदार आंबा वाहतुकीसाठी शासनाने दिलेली परवानगी. गाडीला वाहतुकीचा पास आहे.पण ड्रायव्हरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाय योजना केलेली नाही.त्यामुळे कोणीही उठतो आणि जादा पैसा मिळतो म्हणून ड्रायव्हरला बळी देतोच पण त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्य़ातील जनतेला भोगावे लागतील.याचा विचार प्रशासनाने तातडीने करावा.