नितेश राणेंचे ट्विट; मंत्र्यांना आणि आम्हाला वेगळा न्याय का…?
कणकवली ता.०६: पालकमंत्र्यांनी एकच जिल्ह्यात थांबावे,अन्यथा आमचेही ताफे निघतील,त्यांना आणि आम्हाला वेगळा न्याय का ?,कायदा सामान्यांसाठी वेगळा आणि मंत्र्यासाठी वेगळा आहे का?,असा सवाल आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी व्टिटरच्या माध्यमातून केला आहे.पालकमंत्री उदय सामंत यांच्या दोन्ही जिल्ह्याच्या दौर्यावर श्री.राणे यांनी टिका केली आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की,सिधुदूर्ग जिल्ह्यायत कोरोनावा प्रभाव वाढत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या ठीकाणी दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत,अशा रत्नागिरीतून रोज आठ ते नउ गाड्यांचा ताफा घेवून प्रवास करीत आहेत,तसेच गर्दी करुन बैठका घेत आहेत.त्यांच्या सोबत पोलिस यंत्रणा असते पण कोणीही त्यांना थांबवत नाही.
बाकीच्यांना सोशल डिस्टंन्सिंगचे धडे हे योग्य नाही,गर्दी तेच करू शकतात का ?,असा शासन अध्यादेश असला तर मागितला पाहीजे,कायदा सर्वासाठी समान आहे.त्यामुळे यापुढे पालकमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात थांबावे,अन्यथा आमचे ही ताफे निघतील हे प्रशासनाने लक्षात ठेवावे आणि कोरोनाच्या काळात राजकारण न करता लढावे त्यासाठी आमचे नक्कीच सहकार्य राहीले,असे त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे.