सर्व व्यवहार ठप्प : रस्तेही झाले सुने सुने
वेंगुर्ले.ता.06ःवेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने व वेंगुर्ला शहर कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्याने केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आज बुधवार पासून वेंगुर्ला शहरातील सर्व दुकाने आणि मार्केट बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.
मुंबई सध्या रेडझोन मध्ये असल्याने या भागात कुणाचा संपर्क आल्यास धोकादायक ठरू शकतो. आंबा व्यावसायिकांच्या फायद्यासाठी शासनाने त्यांना आंबा विक्रीसाठी पास ऊपलब्ध केले. पण ते देताना काही नियमही घातले होते, परंतु त्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर अंकुश नसल्याने वायंगणी सारखी घटना होऊ शकते हे समोर आले. हा प्रकार घडल्या नंतर वेंगुर्ले येथील आंबा वाहतुकीला बंदी घातली जाऊ शकते. पण आंबा वाहतूक दारांनी व आंबा निर्यात करणार्यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे आता संपुर्ण तालुकावासीयांना याची किंमत मोजावी लागणार आहे.
ग्रीन झोन चे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्ग वासीयांना हा मोठा धक्का आहे, या मागची कारणे शोधून प्रशासनाने पावले उचलली तरच याची पुनरावृत्ती होणार नाही.दरम्यान वेंगुर्ले शहरातील सर्व दुकाने, बाजार व लोकांच्या रहदारीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आलेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मेडिकल, रेशन दुकान ते भाजी विक्री पर्यंत चे सर्व व्यवहार बंद राहतील. बंदीचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केले आहे. त्यामुळे आज दिवसभर शहरात शुकशुकाट जाणवत होता. मात्र या बंदीतून आपली कधी सुटका होते याकडे वेंगुर्लेवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
[5:37 pm, 06/05/2020] Breaking Malavani: ?
[5:37 pm, 06/05/2020] Breaking Mal 6: ?