Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादस्तनोंदणी कामकाज पुर्ववत सुरु...

दस्तनोंदणी कामकाज पुर्ववत सुरु…

सिंधुदुर्गनगरी.ता,०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज पुर्ववत सुरु करण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजूरी दिली आहे.
सदर कामकाजावेळी पाळावयाचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. कार्यालयामध्ये एका वेळेस चार पेक्षा जास्त पक्षकार उपस्थित राहणार नाहीत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणार नाही याकरिता शारिरीक अंतर ठेवण्याबाबत कटाक्षाने पालन करावे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या परिपत्रकातील सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आदेश जिल्हधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments