नगराध्यक्ष दिलीप गिरप; सकाळी ८ ते ११ वेळेत परवानगी…
वेंगुर्ले.ता.६: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील सर्व जीवनावश्यक दुकाने यामध्ये दुध, भाजी, किराणा, मेडिकल या चारच सेवा सुरू करता येणार आहेत. व्यावसायिकांनी शासनाच्या नियमांचा अवलंब करून आपली दुकाने, उद्या दिनांक ७ मे सकाळी ८ वा. ते ११ वा. या कालावधीत सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. असे नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप यांनी जाहीर केले आहे.
वायंगणी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडतच वेंगुर्लेत एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने काल रात्री अचानक आज शहरातील सर्व दुकाने तसेच सर्व व्यवहार या मार्ग बंद राहाणार असे जाहीर केले. त्या नुसार आज सर्व बंद होते.
दरम्यान या रुग्णामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली असून सगळीकडे ही एकच चर्चा दिवसभर सुरू आहे. दरम्यान शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी
ही सर्व आस्थापने राज्य शासनाने निर्देशित केलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून त्याच प्रमाणे सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगचे योग्य रीतीने स्वतः च्या जबाबदारीने पालन करावे तसेच आपला व्यवसाय करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री. गिरप यांनी केले आहे.