डॉक्टर कडून प्रकार; संबंधित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल,चौकशीची मागणी
पुणे
येथे एका हाॅस्पीटल मध्ये काम करणाऱ्या नर्सना तेथील एका डॉक्टर कडून खोली खाली करण्याची धमकी देण्यात आली आहे.
कोरोना काळात संरक्षणासाठी आवश्यक असलेले पीपीई कीट मागितल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडला आहे.
दरम्यान त्या मुली सावंतवाडीतील आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी चित्रीकरण केला असून हा सर्व प्रकार कळल्यानंतर धमकी देणाऱ्या डॉक्टरचे पितळ उघडे आहे. विशेष म्हणजे संबंधित डॉक्टरने त्या मुलींना अश्लील शब्दात विचारणा केली तसेच आई-वडिलांना तुम्हाला भांडी घासायला पाठवले पाहिजे असे सांगून त्यांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
घडलेला प्रकार असा सावंतवाडी शहरातील काही मुली पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात सद्यस्थितीत कोरोना पेशंट त्या ठिकाणी आहेत. मात्र संबंधित डॉक्टरने आरोग्याची खबरदारी म्हणून आवश्यक असलेले पीपीई कीट न देता त्या युवतींना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र रुग्ण तपासताना आमचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न संबंधित नर्सला पडल्यामुळे त्यांनी याबाबत संबंधित डॉक्टरला विचारणा केली यावेळी त्या डॉक्टरने मुलींना पीपीई कीट उपलब्ध करून देण्या ऐवजी खोली खाली करण्याची धमकी दिली .तसेच घाणेरड्या शब्दात विचारणा केली या प्रकाराचा व्हिडिओ संबंधित योजना मोबाईलवर चित्रित करू आपल्या सावंतवाडीतील नातेवाईकांना पाठविल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला .या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे . दरम्यान त्या मुली पुणे येथे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले डॉक्टरकडून झालेल्या नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अशाप्रकाराची चौकशी करण्यात यावी