Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सावंतवाडीतील शेतकर्‍याचा खारीचा वाटा....

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सावंतवाडीतील शेतकर्‍याचा खारीचा वाटा….

जगदेव गवस यांचा पुढाकारः
शेतीतील उत्पन्नातून दिले दहा हजार रुपये

सावंतवाडी.ता,०७: कोरोनाच्या संकटात शेतकरी होरपळलेला असताना,सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे गावातील शेतकर्‍याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजाराची मदत देवून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
नुकताच त्यांनी हा धनादेश सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण शेती उत्पन्नातून मिळालेली दहा हजाराची मदत आपण कोरोनाग्रस्तांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी,गजा नाटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments