Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या...मग संजू परब शिवसेनेत प्रवेश का करत होते...?

…मग संजू परब शिवसेनेत प्रवेश का करत होते…?

अनारोजीन लोबो ;पालिकेच्या इतिहासात ठेकेदारांकडे पैशाची मागणी

सावंतवाडी.ता,०७: नारायण राणे यांचा आदर्श आमच्या पालकमंत्र्यांना सांगणारे नगराध्यक्ष संजू परब मध्यंतरीच्या काळात शिवसेेनेत का प्रवेश करत होते. याचे उत्तर त्यांनी आम्हाला द्यावे,असा सवाल शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
सावंतवाडी नगरपालिकेच्या इतिहासात ठेकेदारांची बैठक पहिल्यांदाच झाली.यावेळी उपस्थित ठेकेदारांकडे ५ टक्केची मागणी दोन नगरसेवकांकडून करण्यात आली.याचा पुरावा आपल्याकडे आहे.पालिकेत आता सर्व मटका कींगच बसतात. यामुळे परबांनी आपल्याला अधिक बोलायला लावू नये, असेही त्यांनी सांगितले.
आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लोबो बोलत होत्या.यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अमेय तेंडोलकर, अशोक दळवी, गजानन नाटेकर हे उपस्थित होते.

यावेळी लोबो म्हणाल्या, माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका करणार्‍या परब यांनी केसरकरांनी आपल्या निधीतून मास्क वाटले, आणि ते शिवसेनेच्या नगरसेवकांनी फोल्डरमध्ये भरले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ टीका करण्यासाठी खोटी माहिती देऊ नये. कोणत्याही कर्मचार्‍याकडून ते फोल्डरमध्ये भरण्यात आले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आमच्या पालकमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा परब यांनी आपल्या नगरपालिकेत लक्ष द्यावा. त्या ठिकाणी येणार्‍या मटकाकींगना रोखावे, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
संजू परब हे नगराध्यक्ष म्हणून नवीन आहेत. त्यांनी काम करताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. तात्काळ निर्णय घेणे योग्य नाही. पालिकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे. त्यामुळे सभापती केबीन किंवा आपली केबीनचे काम थेट सुरू करणे चुकीचे आहे. २४ तास पाणी देणार असे सांगणारे परब दिवसातून एकवेळासुद्धा पाणी देऊ शकत नाही, ही शहरवासियांसाठी शोकांतिका आहे. त्यांचा प्रशासनावर ताळमेळ नाही. पालिकेत कोणीही येतात आणि चक्क सभापतींच्या खुर्चीवर बसतात हे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments