अनारोजीन लोबो; ती जागा आरक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे…
सावंतवाडी,ता.०७: येथील जिमखाना परिसरात उभारण्यात येणार्या कंटेनर थिएटरला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. ती जागा आरक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी थिएटर उभारला जावू शकत नाही. त्यामुळे संजू परब यांनी आवश्यक परवानग्या घेऊनच असे प्रकल्प उभारावेत अशी टीका आज येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केली
दरम्यान सावंतवाडी शहरात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. परंतू हे स्मारक होण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व परवानग्या त्यांनी घ्याव्यात.लोकांसह सर्वाना विश्वासात घ्यावे.महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. त्यामुळे तो प्रकल्प रेंगाळू नये, यासाठी आम्ही जागा सुचविली आहे. स्मारकावर स्मारक होऊ शकत नाही, असाही पुनरुच्चार आज त्यांनी केला. लोबो यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती अशोक दळवी, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे यांच्या संकल्पनेतून येथील जिमखाना मैदानावर कंटेनर थिएटर उभारण्यात येणार होते. त्यासाठी १ मेचा मुहूर्त राणेंनी जाहिर केला होता. परंतू कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात हा मुहूर्त १ सप्टेंबरला पुढे ढकलल्याचे नितेश राणे यांनी जाहिर केले. परंतू आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोबो यांनी त्या ठिकाणी जागा नाकारली असल्याची माहिती दिली. तसेच आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊनच नगराध्यक्ष संजू परब यांनी असे प्रकल्प सुरू करावे, असे त्यांनी सांगितले.