रुपेश राऊळ यांचा नगराध्यक्ष संजू परबांना टोला…
सावंतवाडी.ता,०७: नेमके टक्केवारीचे राजकारण कोणाचे, कोण टक्के घेतात ?,हे नगराध्यक्ष संजू परब यांना सावंतवाडीची जनता लवकरच दाखवून देईल, असे प्रत्युत्तर शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिले. माझ्यावर टक्केवारीचे आरोप करणार्या नगराध्यक्ष परब यांना त्यांच्याच नगरीत माझे दुकान आहे, व्यवसाय आहेत,हे माहित नसणे दुर्दैव आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना काहीच मुद्दा मिळत नसल्याने,अशा प्रकारे खालच्या थराची टीका त्यांना करावी लागली.असेही श्री.राऊळ म्हणाले.काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. परब यांनी राऊळ यांच्यावर टक्केवारी करून जगत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला श्री. राऊळ यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्यावर टीका करण्यासाठी परबांकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे खालच्या थराला जावून त्यांना टीका करावी लागत आहे. हे त्यांचे दुर्दैव आहे. माझे व्यवसाय आहेत, दुकान आहे त्यामुळे टक्केवारी नेमकी कोण घेते, हे थोड्या दिवसांनी कळेल. त्यामुळे अशा आरोपांना मी उत्तर देणार नाही.यावेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करण्याची परब यांची पात्रता नाही.