राणे बंधूंचा पुढाकार ; कलाकारांनी मानले नितेश, निलेश यांचे आभार….
वेंगुर्ले,ता.०७: कोरोनाच्या काळात आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहिलेल्या वेंगुर्लेतील आठ दशावतारी नाट्यमंडळांना आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.त्यांच्या या सहकार्यामुळे मंडळाच्या कलाकारांनी दोघांचे आभार मानले.
यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिह्यामधील दशावतार हि प्रमुख लोककला आहे. त्यांचा कुटंबांचा उदरनिर्वाह या कलेवरच चालतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून दशावतारी नाटकांचे सर्व कार्यक्रम हे लॉकडाऊनमुळे बंद आहेत.आता सर्व मंडळांकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही.महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या आपत्तीमध्ये सर्वांनाच आवश्यकतेप्रमाणे मदत केली. मात्र आपल्या सिंधुदुर्गातील दशावतार या कलेतील कलाकारांना अद्याप मदत केली नाही हे जाणून घेतले. यावेळी खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, (खानोली), पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, (वेंगुर्ले-उभादांडा), नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळ, (मोचेमाड), मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळ (मोचेमाड), आरवली दशावतार नाट्यमंडळ, (आरवली), सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, (आवेरा), अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण, ओकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण अशा 8 पारंपारीक दशावतारी मंडळामधील प्रत्येकी १० कलाकार अशा
८० कलाकारांना आज सुमारे १५ दिवस पुरेल अशा जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, सुरेंद्र चव्हाण, बाळू प्रभू, प्रकाश धावडे यांसह दशावतार मंडळाचे मालक, बाबा मेस्त्री, पार्सेकर, तुषार नाईक, अमोल मोचेमाडकर, मनोज आरोलकर, काका आकेरकर, अनंत गोसावी, काका गोसावी आदी उपस्थित होते.