Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत समीर चांदरकर यांच्या चित्रास प्रथम क्रमांक...

राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत समीर चांदरकर यांच्या चित्रास प्रथम क्रमांक…

मालवण, ता. ७ : पुणे येथील नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट व शिवप्रताप वाद्य पथक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत कट्टा हायस्कूलचे कलाशिक्षक व नेमळे गावचे सुपुत्र समीर चांदरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

कोविड- १९ च्या संकटामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात रंग, रेषा, आकाराच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांची कल्पनाशक्ती खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या पहिल्या नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट, पुणे व शिवप्रताप वाद्य पथक ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ही स्पर्धा २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत घेण्यात आली.
पुणे शहर व जिल्हा, मुंबईसह उपनगर, कोपरगाव, शिर्डी, नगर, सातारा, सांगली, करमाळापासून ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ९०० स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण पुण्यातील नामवंत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे कलाशिक्षक जयंत टोले व सुरेश वरगंटीवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments