पुंडलिक दळवीःवारंवार दुकाने बंद करण्यास सांगितले जात असल्याने मोठे नुकसान
सावंतवाडी.ता,०७: शहरात दुकाने आणि हॉटेल उघडण्यावरुन व्यापारी आणि पालिका प्रशासनात संभ्रमावस्था आहे.एकीकडे
दुकाने सुरू करण्यास सांगितली जातात,तर दुसरीकडे बंद करण्यास सांगितली जात आहेत. त्यामुळे व्यापार्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नेमका खेळखंडोबा टाळण्यासाठी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी राष्ट्रवादीे उद्योज व व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात गेले दोन ते तीन दिवस पालिका प्रशासनाकडुन मनमानी सुरू आहे.कधी तरी दुकाने सुरू करण्यास सांगितली जातात,तर तीच दुकाने अचानक येवून बंद करण्यास सांगितली जातात. त्यामुळे व्यापार्यात नाराजी आहे. दुसरीकडे हॉटेल व्यावसायिंकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाने धरसोड वृत्ती न बाळगता योग्य तो निर्णय द्यावा. सर्व व्यापार्यांशी संवाद साधून कोणती दुकाने उघडावीत, कोणती उघडू नयेत,याची माहीती द्यावी,अशी दळवी यांनी मागणी केली आहे.