कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामपुरूष युवा मित्रमंडळाचा उपक्रम…
वेंगुर्ले.ता,०७: कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता परबवाडा-शिरोडा येथील रामपुरूष युवा मित्रमंडळा मार्फत आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात शिरोडा परिसरातील ६४ रक्तदात्यानी रक्तदान करून या महान कार्यास हातभार लावला.
शिरोडा येथे श्री. देवी माऊली सभागृह मध्ये हे शिबीर घेण्यात आले. गेली ८ वर्षे रामपुरुष युवा मित्र मंडळ दरवर्षी सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. पण यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता योग्यप्रकारे नियोजन करून आवश्यक ती काळजी घेऊन शिबिराचे आयोजन केले गेले.
शिबिराच्या आधी व नंतर शिबिर ठिकाणी औषध फवारणी केली गेली. तसेच सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करून व sanitizer वापरून मग शिबिर ठिकाणी प्रवेश दिला जात होता. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याना डॉक्टरांच्या सल्ल्याने पाणी, कॉफी बिस्किट देण्यात आले.
या कार्यास मंडळास श्री देवी माउली सभागृह मोफत उपलब्ध करून दिले याबद्दल विश्वस्त तसेच मंडळाचे श्री.सचिन गावडे यांनी स्प्रे पंप मोफत उपलब्ध करून दिला, मा.जिल्हा रुग्णालय रक्त संकलन केंद्र सर्व अधिकारी/कर्मचारी, मा.तहसिल कार्यालय, मा.पोलिस अधिकारी/कर्मचारी, मा.सरपंच व सदस्य, ग्रामपंचायत कार्यालय, रेडी वैद्यकीय केंद्र व सर्व मार्गदर्शक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या बद्दल
रामपुरुष युवा मित्र मंडळा तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.