Monday, January 13, 2025
Google search engine
HomeUncategorizedकन्टेंन्मेंट झोनमध्ये होणार ४ हजार ७८२ नागरिकांची आरोग्य तपासणी...

कन्टेंन्मेंट झोनमध्ये होणार ४ हजार ७८२ नागरिकांची आरोग्य तपासणी…

डॉ.महेश खलिपे; तपसाणीसाठी एनएचएम, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांची नेमणूक…

  1. सिंधुदुर्गनगरी ता.०७: वेंगुर्ला तालुक्यातील वयंगणी गावात कॉन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. या झोनमध्ये २३ सेक्टर तयार करण्यात आले असून त्यामध्ये ४ हजार ७८२ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
    यामध्ये वायंगणी, तळेकरवाडी आणि खानोली या गावांचा कॉन्टेन्मेंट झोनमध्ये सामवेश होतो. या गावांमध्ये आरोग्य तपसाणीसाठी एनएचएम, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. या तपासणीसाठी 23 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये 1 हजार 178 घरातील 1 हजार 331 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
    तयार करण्यात आलेल्या सेक्टर्सची माहिती पुढील प्रमाणे आहे. वायंगणी येथील नांद्रुखवाडी, नाईकवाडी, धोंडवाडी, पंडीतवाडी, कामतवाडी, वायंगणी, पोईवाडी, बागायतवाडी, कांबळीवाडी – बागायतवाडी, तळेकरवाडी येथील कोंडुरा, निवती, तळेवाडी, अवेरा, धनगरसडा, खानोली येथील घोगलवाडी, मेस्त्रीवाडी, समतानगर, अंबेवाडी, कात्रणीचे भाटले, देऊळवाडी – 1, देऊळवाडी – 2, सावंतवाडा, धनगरसडा या वाड्या वस्तींचा समावेश होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments