ओरोस ता.०७:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील २७ वर्षीय युवक २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात दाखल झाला होता. त्याला गावात जावू दिले नव्हते. यंत्रणेने त्याला तात्काळ कुडाळ रेस्ट हाउस येथे क्वारंटाइन केले होते. ५ मे रोजी त्याचा नमूना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्नाला ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे.त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४ झाली असून त्यापैकी १ रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.तर ३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.