मोहिनी मडगावकर; कंटेनर थिएटरचा दिलेलाशब्द नितेश राणे नक्कीच पूर्ण करतील…
सावंतवाडी ता.०७: कंटेनर थिएटर झाले तर त्याचा फायदा लोकांना होईल,शहराचा विकास होईल,त्यामुळे विरोधासाठी विरोध करणे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या आनारोजीन लोबो यांना शोभत नाही,असे प्रत्युत्तर भाजपच्या कार्यकर्त्या मोहिनी मडगावकर यांनी दिले आहे.
अर्धवट प्रस्ताव,आरक्षित जागा असे कारण पुढे करून सावंतवाडी शहरात उभे राहत असलेल्या कंटेनर थिएटरला प्रशासनाने परवानगी नाकारली,अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत लोबो यांनी दिली. याला मडगावकर यांनी प्रत्युत्तर दिले.एखाद्या प्रकल्पाला विरोध न करता कौतुक होणे गरजेचे होते.आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होणारे कंटेनर थेटर शहराच्या विकासात भर घालणार होते.परंतु विरोधकांनी केवळ राजकारण करण्यासाठी टीका करण्याचा उद्योग सुरू केला आहे.परंतु सावंतवाडीची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही,काही झाले तरी आमदार नितेश राणे आपले स्वप्न निश्चितच पूर्ण करतील,हा आम्हा कार्यकर्त्यांना विश्वास आहे,असे मडगावकर यांनी म्हटले आहे.