Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअर्जुन रावराणे विद्यालयाचा ऑनलाईन 'वर्क फ्राॕर्म होम' माध्यमिक विभागाचा निकाल जाहीर

अर्जुन रावराणे विद्यालयाचा ऑनलाईन ‘वर्क फ्राॕर्म होम’ माध्यमिक विभागाचा निकाल जाहीर

वैभववाडी.ता,०८: देशभरात सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनिअर कॉलेज, यांच्या इ. ५ वी. ते ८ वी. व इ. ९ वी तसेच इ. ११ वी च्या द्वितीय सत्र परीक्षा रद्द करण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला. व शासनच्या पत्रानुसार कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत इ. ५ वी. ते इ.९ वी परीक्षा रद्द करून सत्र -०२ मधील आकारिक मूल्यमापनातील पात्र गुणांच्या आधारे वर्गोंनती देण्याबाबत आदेश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले. त्यानुसार अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस नादकर, प्रशालेचे परिक्षा प्रमुख एस. बी. शिंदे व सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेच्या माध्यमातून आज प्रशालेच्या निकालाचे कामकाज पुर्ण केले.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना व्हॉट्स अॕप, फेसबुक, मेसेज या प्रकारच्या ऑनलाईन साधनांद्वारे त्यांचा निकाल वर्ग शिक्षकांच्या मार्फत पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या ऑनलाईन अध्ययन-अध्यापन या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन करून घरी रहा.. सुरक्षित रहा असा संदेश तालुक्यातील सर्व विद्यार्थींना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments