सावंतवाडी उपसभापती भाजपा तालुकाध्यक्ष ; जिल्हा प्रशासनाने पुर्नविचार करण्याची मागणी
सावंतवाडी.ता.०८:कोरोनाचे जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता ज्यांना गरज आहे,अशाच लोकांना या ठीकाणी आणा नाहक पर्यटन नको,कोणाला आणावे याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ते धोरण ठरवावे.सरसकट सर्वाना ई-पास वाटू नका,अशी मागणी सावंतवाडी भाजपाचे तालुकाध्यक्ष तसेच पंचायत समिती उपसभापती शितल राउळ यांनी आज येथे संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.यावेळी सभापती मानसी धुरी उपस्थित होत्या.
दरम्यान सदयस्थितीत सावंतवाडी तालुक्यात असलेल्या शाळांमध्ये अशा लोकांची व्यवस्था होणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी कशी काय घेणार..? याबाबत पुर्नविचार व्हावा,केवळ भावनिक होणे चुकीचे होणार आहे,असे ही त्यांनी यावेळी सांगितले. श्री गावडे व राउळ यांनी आज येथे पंचायत समिती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणी राज्य शासनाकडुन वारंवार घेण्यात येणार्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला.ते म्हणाले,या ठीकाणी गावागावात मुंबई पुण्यासह बाहेर अडकलेल्या लोकांना आणण्याबाबत जिल्हा प्रशासनावर नियोजन झाले.परंतू त्यात लोकप्रतिनीधी आणी सरपंच म्हणून कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही,थेट जिल्हाधिकार्यांनी मुख्याध्यापकांना शाळांची साफसफाई करण्यात सांगितली. आमचा कोणाला आणण्यास विरोध नाही,परंतू सरसकट सगळ्यांना या ठीकाणी आणल्यास त्याचा फटका ग्रामीण भागात बसणार आहे.बर्याचश्या शाळा या भरवस्तीत आहे.तसेच कॉरन्टाईन केलेल्यांना घरातून जेवण देण्याचा मुभा देण्यात आल्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता, याबाबत योग्य ते नियोजन होणे गरजेच आहे.त्यासाठी प्रशासनाने सुध्दा काहीसे कठोर होणे गरजेचे आहे.असे त्यांनी सांगितले.