बांदा.ता.०८:सावंतवाडीत आज सकाळी एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना,असनिये येथिल २८ वर्षीय युवकाने आपल्या घरात गळफास लावत आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज दुपारी उघड झाला.मिलींद नंदकिशोर ठीकार रा. असनिये कणेवाडी असे त्याचे नाव आहे.याबाबतची माहीती बांदा पोलिस ठाण्यात पोलिस पाटील विनायक कोळपाटे यांनी दिली आहे.त्यानुसार घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदरचा युवक बेंगलोर येथे आयटी फर्ममध्ये नोकरीस होता. लॉकडाऊनमुळे तो काही दिवस घरातून काम करत होता. चार दिवसांपूर्वी त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता.शुक्रवारी सकाळी त्याने आईला काकाच्या घरी ठेवलेला लॅपटॉप आणण्यासाठी पाठवले. लॅपटॉप घेऊन त्याची आई घरी परतल्यावर मुलाने दोरीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. वर्षभरापूर्वी युवकाच्या वडिलांचे निधन झाले.पोलीस पाटील विनायक कोळापटे यांनी या आत्महत्येबाबत पोलिसांना माहिती दिली.बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.