चौकुळ येथील घटना; उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल…
आंबोली ता.०८: गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली.ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चौकुळ परिसरात घडली.सोनी माया पाटील (४६),मूळ रा.दोडामार्ग-भेकुर्ली-सध्या रा.चौकुळ-जळवाडी,असे तिचे नाव आहे.दरम्यान तिच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव व पृथ्वीराज प्रताप यांनी जखमी महिलेची भेट घेऊन विचारपूस केली.
याबाबत अधिक माहिती, अशी की संबंधित महिला गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती,तर मग यावेळी अचानक तिच्यावर अस्वलाने हल्ला केला.यात तिच्या पायाचा व मांडीचा अस्वलाने चावा घेतला आहे.दरम्यान तिला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.तेथून अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.