उदय भोसलेंची जिल्हाधिकार्यांकडे मागणी; जबाबदारीनं घ्या,अन्यथा लोकांच्या जीवितासाठी आंदोलन…
सावंतवाडी ता.०८: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत असतानाच पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तर आतापर्यंत याठिकाणी सापडलेले चारही रुग्ण हे रेड झोन मधून आलेले आहेत.त्यामुळे रेड झोन मधून येणाऱ्या व्यक्ती कशा येतात यावर बारकाईने नजर ठेवा,तसेच सध्या बाधित रुग्ण आढळलेल्या वेंगुर्ले व कुडाळ तालुक्याच्या सीमा बंद करा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य उदय भोसले यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.दरम्यान प्रशासन जबाबदारीने काम करत नसेल,तर लोकांच्या जिवीतासाठी आम्हाला नाइलाजास्तव आंदोलन करावे लागेल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
त्यात म्हटल्या प्रमाणे, वेंगुर्ला व कुडाळ येथे कोरोना प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडले आहेत,आता हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने उपायोजना राबविल्या पाहिजेत,सिंधुदुर्गात इतरत्र या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेंगुर्ला, कुडाळ हे दोन्ही तालुके सील करण्यात यावेत,तसेच आपला जिल्हा कोरोना मुक्त होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष किंवा शिथिलता झाल्याने रोगाचा या जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.तर दुसरीकडे आंबा वाहतूकिसाठी परवाना कोणत्या निकषावर दिला जातो,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.