Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोळोशी येथे डंपरची संरक्षक कठड्याला धडक...

कोळोशी येथे डंपरची संरक्षक कठड्याला धडक…

जीवित हानी नाही; भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी….

कणकवली, ता.०८: देवगड-नांदगाव मार्गावरील कोळोशी वरचीवाडी येथे भरधाव वेगाने जाणारा डंपर रस्त्यालगतच्या संरक्षण कठड्याला आदळून अपघातग्रस्त झाला.सकाळी सात वाजता ही घटना घडली. चिर्‍याची वाहतूक करणारा डंपर कोल्हापूरला जात होता. दरम्यान भरधाव वेगाने जाणारे डंपर अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अशा डंपरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
देवगड तालुक्यातून चिरे घेऊन मोठ्या संख्येने डंपर कोल्हापूरला जातात. देवगड-निपाणी रस्ता मोकळा असल्याने डंपर भरधाव वेगाने हाकले जातात. आज कोल्हापूरला जाणारा एमएच 09 सीयू 1172 हा डंपर कोळोशी वरचीवाडी येथे अपघातग्रस्त झाला. वेगाने जाणार्‍या डंपर चालकाचे कोळोशी येथे वाहनावरील नियंत्रण सुटले. सुदैवाने डंपर रस्त्यालगतच्या संरक्षण कठड्याला आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच चालकही बचावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments