सावंतवाडीतील विलगीकरण कक्षात शहरातील व्यक्तींनाच क्वारंटाईन करा…

502
2
Google search engine
Google search engine

सुरेश भोगटेंची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी; कोरोनाचा फैलाव झाल्यास लोकांच्या जीवितास धोका…

सावंतवाडी ता.०८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी तयार केलेल्या शासकीय विलगीकरण कक्षात फक्त शहरातील व्यक्तींनाचं क्वारंटाईन करण्यात यावे,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे केली आहे.दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या अनेकांना याठिकाणी क्वारंटाईन केले जात आहे.मात्र शहरातील लोकसंख्या लक्षात घेता याचा फैलाव झाल्यास लोकांच्या जीवितास धोका आहे.त्यामुळे त्यांना त्यांच्या गावाकडेचं क्वारंटाईन करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत त्यांनी आज प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सध्या कोरोना विषाणू जगभर पसरत असताना ठिकठिकाणाहून लॉकडाऊन कालावधीमध्ये अडकलेली तसेच इतर मंडळी अनेक जिल्ह्यांमधून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करत असताना संबंधितांना होम क्वारंनटाईन व संस्थात्मक क्वारंनटाईन अशाप्रकारे १४ ते २८ दिवस क्वारंनटाईन केले जात आहे. मात्र अशाप्रकारे सर्व व्यक्तींना सावंतवाडी येथे क्वारंनटाईन न करता सदर व्यक्तीच्या गावची असेल त्या गावांमध्ये त्याला क्वारंनटाईन ठेवणे उचित होईल, सावंतवाडी शहरातील व्यक्तींनाच फक्त सावंतवाडी येथे क्वारंनटाईन ठेवणे योग्य आहे.
सावंतवाडी शहराची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजार असून या आजाराचा फ़ैलाव झाल्यास येथील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शहरामध्ये सध्या पाण्याची समस्या भेडसावत असून क्वारंनटाईन व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होणाऱ्या आहेत.                                              तरी क्वारंनटाईन होणाऱ्या व्यक्ती ज्या भागातील असेल त्या भागातच त्या व्यक्तीला क्वारंनटाईन करण्यात यावे, आणि सावंतवाडी शहरवासीयांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी.