लाठ्या-काठीने मारहाण; परस्पर आठ जणांविरोधात गुन्हे दाखल…
सावंतवाडी ता.०८: घरावर आलेले फणसाचे झाड तोडण्याच्या रागातून कोलगाव निरुखे येथे दोन कुटुंबियांत वाद झाले.यातून दोघांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निरुखेवाडी परिसरात घडली.याप्रकरणी दोन्ही बाजूने दिलेल्या तक्रारीनुसार तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की ,कोलगाव निरुखे येथे रोड्रिक्स व मालवणकर कुटुंबीयांची घरे एकमेकांच्या शेजारी आहेत.घराच्या शेजारी असलेले फणस काढण्यासाठी कामगार बोलविण्यात आला होता.फणस काढण्यासाठी कामगार गेला असता फणसाचे झाड आपल्या जागेत असल्याचा दावा दोन्ही कुटुंबियांकडून करण्यात आला.यावेळी दोन्ही कुटुंबीयांमध्ये शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला.यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या.
यामध्ये माग्देलिन रॉड्रिक्स यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वृषाली मालंडकर यांच्यासह त्यांचा भाचा, भाची, आई असे मिळून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर रुशाली मालणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माग्देलिन रॉड्रिक्स तिचा मुलगा नेल्सन रॉड्रीक्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कदम करत आहेत.