उद्धव ठाकरे; कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा फक्त गतिरोधक
मुंबई ता.०८: कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात लष्कर बोलविण्याची गरज नाही,अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये,राज्यातील प्रत्येक नागरिक हा जवान आहे,आणि तो कोरोना विरुद्धचा लढा लढण्यासाठी सक्षम आहे,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान लॉकडाऊन चा कालावधी किती दिवस असेल हे माहीत नाही,कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा फक्त गतिरोधक आहे,त्यासाठी या विषाणूची साखळी आपल्याला तोडायची आहे,आणि कोरोनाला हरवूनच आता हे युद्ध संपवायचे आहे,असेही यावेळी बोलताना श्री.ठाकरे म्हणाले,याबाबतची माहिती त्यांनी आज लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली.
ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात लष्कर बोलवणार असल्या संदर्भात अफवा पसरविल्या जात आहेत.त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, तुम्हीच या लढ्यासाठी सक्षम आहात आणि ते सहकार्य प्रत्येक नागरिकाने करणे अपेक्षित आहे.कोरोनाना भार सध्यस्थितीत सर्वच यंत्रणांवर आहे,यात डॉक्टर व पोलीस यंत्रणांना विश्रांती सुद्धा घेता येत नाही.दरम्यान सेवा देणारे अनेक डॉक्टर्स व पोलीस सुद्धा आजारी पडत आहेत,तर काहींच्या जीवावर मृत्यू बेतत आहे.त्यामुळे आजारी पडल्यावर त्यांना विश्रांती देणे हा मी क्रूरपणा समजतो,त्यासाठी त्यांना सुद्धा विश्रांती मिळणे आवश्यक आहे,आणि वेळ पडल्यास आपण केंद्रशासनाशी बोलून अतिरिक्त मनुष्यबळ याठिकाणी बोलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, मात्र याचा अर्थ या ठिकाणी लष्कर आणणार असा होत नाही,असेही यावेळी त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्याच बरोबर या आजारातून पूर्णता बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा आनंददायी आहे. फक्त ज्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले, अशा व्यक्ती वेळ गेल्यानंतर उपचारासाठी आलेल्या आहेत, तर काहींचा मृत्यू हा तपासणी करण्यापूर्वी झालेला आहे.त्यामुळे सर्दी खोकला ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी वेळीच आपली तपासणी करून उपचार करून घ्यावेत, व कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी शासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रासाठी एक आनंददायी बातमी सुद्धा आहे.प्रसूतीसाठी अनेक महिला रुग्णालयात दाखल आहेत,त्यातील सुद्धा काहींना कोरोनाची बाधा झाली होती.मात्र प्रसूतीनंतर त्यांच्या बाळाचे रिपोर्ट हे कोरोना निगेटिव्ह आले आहेत,त्यामुळे हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल.दरम्यान त्यांनी आज झालेल्या रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले ,परराज्यातील कामगारांनी जीवावर उदार होऊन आपल्या राज्यात जाण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, आमचे राज्य राज्यांशी संपर्क सुरू आहेत ,आणि सर्वांना सुखरूप सोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आमच्याकडून केल्या जात आहेत, मात्र असे असताना अफवांवर विश्वास ठेवून आपले घर गाठण्यासाठी कोणीही जीवावर उदार होऊ नये ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.