भुईबावडा घाटात केली कारवाई; विदेशी दारूसह मोटारसायकल जप्त
वैभववाडी.ता,०८: भुईबावडा घाटातून अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या भुईबावडा येथील भूषण आकाराम मोरे वय ४२ याला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याजवळील सोळा हजाराची विदेशी दारू व मोटरसायकल जप्त केली आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास वैभववाडी पोलिस भुईबावडा घाटात तपासणीसाठी गेले होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती साखरे, गणेश भोवड यांना मोटरसायकल क्रमांक एमएच-09 बीएच- 6697 ने भूषण मोरे हा मोटारसायकलला काहीतरी बांधून भुईबावड्याच्या दिशेने येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपासणी केली असता मोटरसायकलवर विदेशी मद्याची सोळा हजाराची दारू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे.