कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगुळवाडी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू…
वैभववाडी,ता.०९: तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात आतापर्यंत २३ जणांना ठेवण्यात आले आहे.गुरुवारी तब्बल ९ लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे.यामध्ये रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे सह अन्य जिल्ह्यातून आलेल्या लोकांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने तालुक्यात सांगुळवाडी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु केला आहे.यामध्ये जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात येत आहे.त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नाळ ही मुंबशी जोडलेली आहे.रोजगार धंद्या निमित्त येथील लोक पुणे मुंबई सारख्या महानगरात आहेत.सध्या मुंबई पुणे येथे कोरोनाने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे येण्यासाठी धडपडत आहेत.काहीं तर चक्क चालत, काहीना काही कारणाने गाव गाठला आहे.अशा लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सिमा बंद असतांनाही जिल्ह्याबाहेरुन लोक येत आहेत.त्यामुळे स्थानिकांमधून भित्ती व्यक्त केली जात आहे.तर प्रशासनही हतबल झाले आहे. मुंबई सारख्या रेड झोन मधून जिल्ह्यात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आले तर त्यांची काय व्यवस्था करता येईल.याबाबत प्रशासन चाचपणी करीत असून गावातील शाळा,अंगणवाडी, समाज मंदिर सारख्या सार्वजनिक इमारतीं बाबत माहीती गोळा केली जात आहे.मात्र प्रत्येक गावात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही खूप मोठी असल्यामुळे त्यांची सोय कशी करायची असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.