सावंतवाडी प्राथमिक शिक्षक संघाची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन…
सावंतवाडी.ता,०९:
कोरोनाचा संसर्ग तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांच्या विलगीकरणाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.मात्र या समितीमधून महिला शिक्षिक व पन्नास वर्षावरील शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी प.स.चे गटविकास अधिकारी गजानन भोसले यांच्याजवळ करण्यात आली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन सादर केले.सावंतवाडी तालुक्यात गांवोंगावी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांकडून प्राथमिक शिक्षक व शिक्षिकांना रात्री-अपरात्री डुटी करण्याबाबत तोंडी सांगण्यात येत आहे.हे योग्य नसून या समितीमधून महिला शिक्षिक व पन्नास वर्षावरील शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अश्या प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आले नसून,याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन शिक्षकांना न्याय दिला जाईल.तसेच कोणत्याही शिक्षकांनी विलगीकरण केलेल्या ठिकाणी थांबू नये,असे गटविकास अधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले.यावेळी संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल.देसाई, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम शेणई,सचिव बाबाजी झेंडे,विजय गावडे आदी उपस्थित होते.