जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या पुढाकारातून उपलब्ध…
वेंगुर्ले.ता.०९: तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष सौ. समिधा नाईक यांनी ‘थर्मल गन’ उपलब्ध करून दिली आहे. कोरोना अंतर्गत गावातील रुग्णांची तपासणी करिता आरोग्य विभागाला ही थर्मल गन फार उपयोगी पडते. त्यामुळे याचा त्यांना फायदा होणार आहे. यावेळी सौ. नाईक यांच्यासोबत आडेली सरपंच समिधा कुडाळकर, माजी जि.प. सदस्य समीर नाईक, सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर, प.स. सदस्य साक्षी कुबल, डॉ. संजीवनी पाटील, ग्रा.प.सदस्य तात्या कोंडस्कर, भाई पेडणेकर, कडव फार्मासिस्ट, नर्स ठाकूर, अल्मेडा, आरोग्य सेवक श्री कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.