वेंगुर्ले पोलिसांची कारवाई ; १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वेंगुर्ले.ता.०९: बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री रेडी-तळीवाडी येथे करण्यात आली. या प्रकरणी दोन दुचाकींसह १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आनंद चोपडेकर (रा. आरवली), महेश फोंडनाईक (रा. टाक), राजन अणसूरकर (रा. अणसूर), सोनू पेडणेकर (रा. आसोली) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडी ते वेंगुर्ले अशी गस्त घालणार्या पोलिसांना हे बेकायदा दारु वाहतूक करताना हे चौघेजण दिसून आले. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड, रंजिता चव्हाण यांनी केली.