उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण;तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी…
दोडामार्ग सुधाकर धर्णे ता.०९: शहरातील काही व्यक्ती बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तींना आसरा देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड होत आहे.त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तहसीलदारांकडे केली आहे.तसेच बाहेरून येणाऱ्यांना थेट शहरात प्रवेश न देता त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे,आणि नंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा,अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.याबाबत श्री.चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दोडामार्ग हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून दोडामार्ग बाजारपेठ ही सद्यस्थितीत खुली करण्यात आली आहे.तसेच दोडामार्ग मध्ये महत्त्वाच्या कामांसाठी विविध शासकीय कार्यालये खुली आहेत,त्यामुळे बाहेरगावचे चाकरमानी किंवा अन्य व्यक्ती ह्या शहरात प्रवेश करत आहेत.काही ट्रान्सपोर्टच्या गाड्या मुंबई पुणे येथून ये-जा करत आहेत.त्यामुळे त्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करावी,आवश्यक असल्यास त्याना क्वांरंटाइन करावे व त्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात यावा,तसेच शहरातील काही व्यक्ती ह्या बाहेर गावातील व्यक्तींना आसरा देत आहेत.त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ),अशी मागणी केली आहे.