आगारनिहाय नोंदणी करण्याचे विभाग नियंत्रकांचे आवाहन
कणकवली, ता.०९: राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी एस.टी.विभागाने सज्जता ठेवली आहे. प्रवाशांनी नोंदणी केल्यानंतर एका बसमध्ये 11 प्रवासी घेऊन एस.टी.सोडली जाणार आहे. तसेच जाण्या-येण्याच्या अंतरासाठी प्रत्येक किलोमिटरमागे 44 रूपये असा दर आकारणी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग एस.टी.विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी आज दिली.
येथील आपल्या दालनात श्री.रसाळ यांनी एस.टी. फेर्यांच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, नोकरी, शिक्षण व इतर करणांमुळे राज्याच्या विविध भागात सिंधुदुर्गातील नागरिक अडकले आहेत. तसेच सिंधुदुर्गातही राज्याच्या विविध भागातील नागरिक लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. या सर्वांना आपापल्या गावापर्यंत सोडण्यासाठी एस.टी.प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. या नागरिकांची ने-आण करण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग विभागही सज्ज झाला आहे.
प्रवाशांना जाण्या-येण्याच्या अंतरास 44 रूपये प्रतिकिलोमिटर असा दर असणार आहे. तसेच प्रती बस 50 रूपये अपघात सहाय्यता निधी द्यावा लागणार आहे. एस.टी. प्रवास करण्यासाठी सक्षम अधिकार्याचे प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. नागरिकांना प्रवासाचे सुरवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशा प्रवासास परवानगी आहे. मधल्या थांब्यावर थांबता येणार नाही. बसमध्ये 22 प्रवासी असणार आहेत. तर प्रत्येक प्रवाशाकडे आधारकार्ड किंवा शासनाने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रवासात मास्क बांधणे बंधनकारक आहे. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आपल्या गावी जाण्याबाबत अधिक माहितीसाठी संबधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग एस.टी.विभागाने केले आहे.
प्रवासाबाबत अधिक माहितीसाठी सिंधुदुर्गातील एस.टी. अधिकारी आणि
आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावयाचा असून त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
प्रकाश रसाळ (विभाग नियंत्रक) 7507470474, अभिजित पाटील (विभागीय वाहतूक अधिकारी) 9689731133, सहाय्यक वाहतूक अधीक्षक गौतमी कुबडे 8275645561.
आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख ः सावंतवाडी – मो.रा.खराडे 9404444440, निवृत्ती शेवाळे 8976600463,
मालवण – नरेंद्र बोधे 9975258534 सचेतन बोवलेकर 8806799191,
कणकवली ः प्रमोद यादव 7057031165, नीलेश लाड 8850473882,
देवगड ः हरेश चव्हाण 9405929708, गं.भा.गोरे 9168823484,
विजयदुर्ग ः अ.शा.मांगलेकर 8624906325, सचिन डोंगरे 7666909558,
कुडाळ ः सुजित डोंगरे 8888202773, रा.ल.राऊळ 9405681835,
वेंगुर्ले ः घ.स.चव्हाण 8983724258, नि.द.वारंग 9422585859,