मालवण, ता.०९: वेरली येथील गणेश सावंत यांच्या मूकबधिर कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाच हजार रुपयांची मदत दिली.
समाजातील गोरगरीब व गरजू कुटुंबाना राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच पाठीशी राहील. येथील मोलमजुरी करणाऱ्या सावंत यांच्या मूकबधिर कुटुंबाला मदतीची आवश्यकता असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना समजल्यानंतर पाच हजार रुपयांची मदत त्यांनी पाठवून दिली होती. त्यांच्या या सहकार्याने सावंत कुटुंबातील गणेश याची पत्नी व वडील यांना औषधोपचारासाठी हे पैसे वापरता येणार आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाटगे, मयूर कुर्ले आदी उपस्थित होते.
वेरलीतील मुकबधीर कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच हजारांची मदत…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES