सावंतवाडी, ता.०९: समाजातील सर्व स्तरावर शांतता निर्माण करणे कोणत्याही प्रकारचे कलह टाळून धार्मिक व जातीय सलोखा व सद्भाव निर्माण करण्याच्या हेतूने सावंतवाडीतील बुद्धीवादी व विचारवंतांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
यात संयोजक म्हणून मेहमुद रखांजी, समीर नझीर बेग, हिदायतुल्ला खान, समीरा खलील, कायदेशीर सल्लागार म्हणून ज्येष्ठ वकील संदीप निंबाळकर तर सदस्य म्हणून अबुल भाई शेख, प्रा. अल्ताफ खान, अफरोज राजगुरु, रफीक मेमन, तौकीर शेख, लियाकत पडवेकर, नझीर आली खान, हबिबा मुल्ला, नझीर शेख, अल्ताफ मुल्ला, रेहान ख्वाजा, समीर शेख, नदीम दरवेश यांचा समावेश आहे.
दरम्यान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजातीय जातीय व धार्मिक सलोखा व सौहार्दाच्या मानवतेला तडा जाणार नाही याची काळजी ही समिती घेणार आहे. सर्व धर्म समानतेच्या तत्वावर विश्वास ठेवून धर्म-धर्मामध्ये एकोपा, सलोखा, बंधुभाव आणि एकात्मता जोपासण्याचे काम या समितीच्यावतीने करण्यात येणार आहे.सामाजिक समता, बंधुता, सलोखा आणि शांतता या गोष्टींना बाधा आणणारी एखादी घटना घडल्यास किंवा अशा घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्यास समितीच्या बैठकित चर्चा करून त्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे काम ही समिती करणार आहे. बैठकित घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असेल. कोणत्याही परिस्थितीत कायदा मोडला जाणार नाही याकडे ही समिती लक्ष देणार आहे. राष्ट्रातील पुज्य महात्मा गांधी यांच्या मार्गाने व सनदशीर मार्गाने समितीची वाटचाल असेल.सावंतवाडीतील समाजात मान्यता असलेले सुसंस्कृत ज्येष्ठ तसेच सुशिक्षीत लोकांची या समितीत समाविष्ट केले आहे. शिवाय ही समिती राजकारणविरहीत असेल. मुस्लिम समाजाताील लोकांवर अन्याय होत असेल व या अन्याया विरोधात सनदशीर लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला जाईल हा समिती स्थापन करण्यामागचा हेतू आहे.सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, कुठेही गर्दी करू नये, घरातच थांबावे आणि शासनाच्या नियमांचे पालन करावे तसेच नमाज, रोजा इफ्तार, तरावीह नमाज घरातच अदा करावी असे आवाहनही समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सावंतवाडीत मुस्लिम समाज शांतता समितीची स्थापना…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES