ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने करण्यात आले आवाहन
वैभववाडी.ता.०९:भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांचा १० मे हा स्मृतिदिन आहे. दि.१० ते १६ मे हा ग्राहकतीर्थ स्मृतीसप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन संस्थेचे राज्याध्यक्ष डाॅ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, कोकण विभाग प्रभारी तथा सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे यांनी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे.
आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी भारतालाच नव्हे तर सार्या जगाला “कल्याणकारी अर्थव्यवस्था व शोषणमुक्त समाज निर्माणाची सूत्रे” दिली १० मे हा त्यांचा स्मृतिदिन ग्राहकतीर्थ स्मृतीसप्ताह म्हणून १० ते १६ मे दरम्यान विविध कार्यक्रमानी साजरा करावयाचा आहे.
यानिमित्त आपण सध्याच्या अभूतपूर्व व वैश्विक संकटकाळात ग्राहकाभिमूख व समाजशरण वृत्तीची जोपासना करीत अनेक उपक्रम हाती घेऊन ग्राहकांमध्ये जागृती, प्रबोधन, हक्क आणि अधिकाराचा प्रसार,आरोग्याची काळजी व ग्राहकांना कायदेशीर मार्गदर्शन याबाबत आॅनलाईन, व्हाॅट्सअॅप व फेसबुक माध्यमातून हे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.