वैभववाडी.ता,०९: करूळ गावठण अ येथील लीलावती दत्ताराम साटम वय ७६ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वैभववाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम (गुरुजी) यांच्या त्या पत्नी होतं. तसेच फोंडा येथील वनपाल शशिकांत साटम यांच्या त्या मातोश्री होतं.
श्रीमती लीलावती साटम यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुवारी त्यांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. करूळ येथील स्मशानभूमीत सोशल डिस्टन्सिंग चा अवलंब करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दिर, जाऊं, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
करुळ गावठण येथील महिलेचे निधन……
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES