सावंतवाडी, ता.१०: वेत्ये येथे झालेल्या कार अपघातात जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांचा मुलगा उदय पांढरे( रा.निरवडे, वय २७)याचे निधन झाले. हा अपघात आज १२ वाजण्याच्या सुमारास नियोजित मुंबई-गोवा महामार्गावर सोनुर्लीकडे जाणार्या रस्त्यावर घडला.अपघातानंतर जखमीला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतू उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. उदय हा काही कामानिमित्त बांद्याच्या दिशेने चालला होता. मात्र वाटेतच त्याला काळाने गाठले. श्री.पांढरे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच येथील रुग्णालयात सर्व पक्षीयांनी गर्दी केली होती.
अपघात झाल्याची माहिती मिळताच, कुटीर रुग्णालयात सर्वपक्षींयानी गर्दी केली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर,प्रमोद गावडे,माजी उपसभापती महेश सारंग,विदया परब,अजय गोंधावळे,सुधिर आडीवरेकर,मनोज नाईक आदींनी मोठी गर्दी केली होती.
उदय हा उच्चशिक्षीत होता. पुणे येथे त्याचे शिक्षण झाले होते. काही दिवसापुर्वी वडीलांनी त्याला निरवडे कोनापाल येथे प्लास्टीकचे साहीत्य बनविण्याची फॅक्टरी घालून दिली होती.त्या ठीकाणी गावातील अनेकांना रोजगार देण्याचे काम उदय करीत होता.आज तो सकाळी काही कामानिमीत्त बांद्याच्या दिशेन जात होता,मात्र वेत्ये येथे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. आणी त्याचे निधन झाले.सर्वाशी मिळून मिसळून वागणे हा उदयचा स्वभाव होता.त्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे अनेकांना रडू कोसळले.