Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोना काळात काम करणार्‍या सरपंचांच्या पाठीशी नितेश राणे

कोरोना काळात काम करणार्‍या सरपंचांच्या पाठीशी नितेश राणे

पीपीई किट, मास्क पुरवणार ; व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधला संवाद

कणकवली, ता.१०: कोरोनाच्या काळात आपल्या जीवावर उदार होवून,ग्रामीण भागात येणार्‍या चाकरमान्यासह अन्य लोकांना सेवा देणार्‍या सरपंचाच्या पाठिशी आपण आहोत, असा शब्द आमदार नितेश राणे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील सरपंचाना दिला.
दरम्यान या काळात सेवा देणार्‍या सरपंचाना आपण आवश्यक असलेले पीपीई कीटसह मास्क उपलब्ध करून देवू,तसेच जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक असलेले सहकार्य उपलब्ध करून देवू,असे त्यांनी आश्वासन दिले. श्री. राणे यांनी आज जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद साधला.कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर गावात येणाऱ्या चाकरमानी मंडळींना शाळा,समाज मंदिरे याठिकांनी क्वारंटाइन करून ठेवण्याची व्यवस्था आणि त्या बद्दलचे नियोजन आम.नितेश राणे यांनी जाणून घेतले.कोरोना मुक्तीच्या या लढ्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेसाठी सरपंच, थेट संपर्कात येऊन काम करणार आहेत.त्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क आपण पुरवू,असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.सरपंचांचे प्रश्न आणि शंका जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रमुख यांच्याशी चर्चा करून सोडविल्या जातील,अशी ग्वाही आम.नितेश राणे यांनी दिली .
कोरोना संसर्ग वाढुनये यासाठी गावा गावात काम करत असलेल्या सरपंचांशी संपर्क साधून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम आमदार नितेश राणे करत आहेत. त्यांनी कणकवली तालुक्‍यातील काही सरपंचांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर यांनी परजिल्ह्यातुन गाडी घेऊन जाणारे, रेड झोन मधून परत येणारे असे स्थानिक चालक-वाहक आहेत.त्यांची माहिती वेळेत मिळावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. तर फोंडाघात सरपंच संतोष आग्रे यांनी फोंडा पोलीस चेकनाका गावाच्या सरहद्दीवर नेला जावा, त्यासाठी आदेश प्राप्त असतांनाही पोलिस दिरंगाई करत असल्याचे सांगितले. चिरे वाहतूक करणारे चालक-वाहक हे परत जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येतात आणि याठिकाणी दोन दिवस राहतात. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.हे निदर्शनास आणून दिले. त्यावर आमदार नितेश राणे यांनी आपण पोलीस अधीक्षक यांच्याशी यासंदर्भात बोललेलो आहे. ज्या पद्धतीने आंबा वाहतूक करणाऱ्यांची काळजी आंबा बागायतदारांनी घ्यावी तशिच चिरेखाण मालकांनी आपल्या चालकांची व कामगारांची काळजी घ्यावी असे ठरलेले आहे. तरीही जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्याशी पुन्हा चर्चा करून हे काम नीटपणे चालू आहे की नाही याची खात्री करून घेतो असे सांगितले.शेरपे सरपंच श्रीमती निशा पवार यांनी शाळांमध्ये क्वारंटाइन केल्या जाणाऱ्या लोकांची दिवसभरात दहा ते पाच या वेळेत काळजी घेण्यासाठी शिक्षक व अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.मात्र त्यानंतरच्या वेळेत त्यांची कोण काळजी घेणार ? स्थानिक समितीला सहकार्य करणारी प्रशासकीय यंत्रना रात्री असणार काय ? यांची माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पीपीई किट्स सरपंच यांना मिळावे अशी मागणी केली.लोरे सरपंच अजय रावराणे यांनी गावात येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य पद्धतीने माहिती मिळत नसल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे ज्यांना मुंबईत आज घडीला राहणे शक्य नाही, त्यांची उपासमार होत आहे. मुंबईत जे स्थायिक नाहीत त्यांना प्रथम गावी आणा नंतर स्थायिक चाकरमान्यांना आणा अशी मागणी केली.आयनल सरपंच बापू फाटक यांनी शाळेत क्वारंटाइन केल्यानंतर जर ५० पेक्षा जास्त लोक असले,तर तेवढी व्यवस्था शाळेत नाही. मग लोकांना कुठे ठेवावे याबाबत प्रशासनाने माहिती द्यावी अशी मागणी केली. यावर आमदार नितेश राणे यांनी आपण संबंधितांशी बोलून दुसरी कोणती व्यवस्था केली आहे. हे आपल्याला कळविण्यात येईल असे सांगितले.जाणवली सरपंच आर्या राणे यांनीही सुरक्षे संदर्भात प्रश्न मांडला.ओझरम सरपंच प्रदीप राणे यांनी अपंग व्यक्तींना शाळेमध्ये क्वारंटाइन करू नये त्यांची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी जेणेकरून त्यांना गैरसोय होणार नाही.असे सांगितल शाळेची क्षमता ओळखून तेवढ्याच लोकांना गावात पाठवावे असे सांगले.संकेडी सरपंच रीना राणे यांनी सुद्धा तोच मुद्दा आपल्यालाही भेडसावत असल्याचे सांगितले. तरळे सरपंच यांनी चाकरमानी जेथून निघतील तेव्हा त्यांची पूर्वकल्पना आपल्याला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळांमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चिंचवली सरपंच रुंजी भालेकर यांनी शाळेत क्वारंटाइन करण्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्याचा आढावा दिला.आम.नितेश राणे यांनी आपल्या या चर्चेनुसार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून प्रत्येक समस्येवर उपाययोजना केली जाईल आणि आपल्याला त्या बाबतची माहिती दिली जाईल असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments