वेंगुर्ला पोलिसांची कारवाई;साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
वेगुर्ले ता.१०: गोव्याच्या सीमेवरून चालत दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना आज रेडी येथे ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या कडून तब्बल साडेसात हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई वेंगुर्ला पोलिसांकडून करण्यात आली.उदय विठ्ठल परब वय ५८,(रा आजगाव-दत्तवाडी),तुकाराम शिवराम केदार (रा.आजगाव-भोमवाडी) वय -६०,अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात दारू वाहतूक करणाऱ्यांकडून तपासणी नाके चुकवून विविध युक्त्या करतात, बेकायदा वाहतूक केली जात आहे. काही लोकांनी तपासणी नाके चुकवण्यासाठी बोटीमधून मधून दारू वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे.त्याला काही गोव्यातील व्यावसायिक सहकार्य करत आहे.दरम्यान अशा प्रकारे चालत दारू घेऊन येणाऱ्या दोघांना आज पोलिसांनी पकडले,त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याला पकडण्यात यश आले असल्याचे सांगितले.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई,रंजीता चव्हाण,हवालदार जितेंद्र कोलते,अजित जाधव यांनी केली.