Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासरपंचांच्या समस्या व अडचणींवर उपाययोजना करा...

सरपंचांच्या समस्या व अडचणींवर उपाययोजना करा…

उदय सामंत; जिल्हा सरपंच संघटनेसोबतच्या बैठकीत प्रशासनाला सूचना…

सिंधुदुर्गनगरी ता.१०: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरपंचचांच्या काही समस्या व अडचणी आहेत. या समस्या व अडचणींवर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हा प्रशसानास दिल्या आहेत.जिल्ह्यातील सरपंच संघटनेसोबत आज जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये पालकमंत्री श्री.सामंत यांनी बैठक आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, नागेंद्र परब, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, यांसह प्रांताधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, इतर संबंधित अधिकारी व सरपंच उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सरपंचांना दिलेल्या जबाबदारी बाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात मुंबई, पुणे येथून येणाऱ्या नागरिकांसाठी अलगीकरण कक्षांची व्यवस्था केली जात आहे. यासाठी गावातील शाळांचा वापर करण्यात येत आहे. याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. तसेच अलगीकरण कक्षांच्या ठिकाणी आरोग्य विषयक सोयी सुविधा, व इतर सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी आवश्यक त्या सर्व सूचना जिल्हा प्रशासनाला व सरपंचांना दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांच्या कडून रेडझोन मधून सिंधुदुर्गात येणाऱ्या नागरिकांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments