माजगाव नाला येथील घटना : अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविले
सावंतवाडी, ता. 10 ः अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात आज साडे सात वाजण्याच्या सुमारास माजगाव-नाला परिसरात घडला. सुभाष जांभळे (रा. चराठा) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. जांभळे हे अॅक्टीव्हा दुचाकी घेवून माजगाव नाला येथून जात होते. तेथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकर दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.