मुंबई.ता,११: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. ठाकरेंनी थोड्याच वेळापूर्वी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी कधीही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक लढवणारे शिवसेनेचे पहिले पक्ष प्रमुख ठरले आहेत.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES