सावंतवाडी, ता. ११ : येथील नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसले.
दरम्यान या प्रकाराची माहिती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दिली. गवे बिनदिक्कत सायंकाळच्या वेळेत फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी सुरक्षेचा भाग म्हणून डोंगरावर फिरण्यासाठी जावू नये असे त्यांनी आवाहन केले आहे.
सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर परिसरात राहणारे बरेचसे जेष्ठ नागरीक सायंकाळी आणि सकाळच्यावेळी नरेंद्र डोंगरांवर पाय मोकळे करण्यासाठी जातात काल सायंकाळी त्या ठिकाणी गेलेल्या काही लोकांना हा गव्याचा कळप आढळून आला. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गवे थेट भरवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना जंगल परिसरात जावून ते गोंधळतील असे वागू नका असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी गजानन पाणपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला आहे. परिसरात गव्यांचा कळप आहे. तो अन्न मिळविण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे लोकांनी आपली सुरक्षितता लक्षात घेवून जंगल परिसरात एकटे जाणे टाळावे असे त्यांनी आवाहन केले आहे.
नरेंद्र डोंगर परिसरात आठ महाकाय गव्यांचा मुक्तसंचार…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES